Home Breaking News कुरणवाडीतील घोडेगीरीच्या म्हाळोबा-बिरोबा गडावर रंगला आमदार खासदार सौभाग्यवतींचा सामना!

कुरणवाडीतील घोडेगीरीच्या म्हाळोबा-बिरोबा गडावर रंगला आमदार खासदार सौभाग्यवतींचा सामना!

0

( सुनील  नजन/अहमदनगर) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घोडेगीरीच्या म्हाळोबा – बिरोबा गडावर विद्यमान आमदार आणि खासदार यांच्या सौभाग्यवतींचा विकास कामाच्या मुद्यावर चांगलाच सामना रंगला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार सुजयदादा विखे यांच्या सुविद्य पत्नी सौ. धनश्रीताई विखे आणि २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्राजक्तदादा तनपुरें यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनालीताई तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घोडेगीरीच्या म्हाळोबा – बिरोबा गडावर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि कलशरोहन समारंभासाठी आवर्जून हजेरी लावली. भागवताचार्य साकुर येथील ह.भ.प. उगलमुगले महाराज यांचे किर्तन सुरू असतानाच सौ.सोनालीताई तनपुरे आणि सौ.धनश्रीताई विखे यांचे आगमन झाले. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या या नवीन म्हाळोबा बिरोबा गडावर येण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने भाविकांनी माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे स्वीय सहायक विजय टापरे आणि सौ सोनालीताई तनपुरे यांच्या कडे मुख्य डांबरी रस्त्यापासून गडावर येण्यासाठी दोन कि.मी. डांबरी रस्त्याची मागणी केली असता ती मागणी मांन्य करत हा रस्ता डांबरी करण्यासाठी प्रस्तावित असल्याचे सांगितले सौ तनपुरे आणि टापरे यांनी सांगितले.त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात समाधानाचे वातावरण पसरले. भाजपचे खासदार सुजयदादा विखे यांच्या पत्नी सौ धनश्रीताई विखे यांनी या मंदिरा समोर सुजयदादा विखे यांच्या खासदार निधी अंतर्गत सभामंडप बांधून देण्याचे जाहीर करताच धनगर समाजाच्या वतीने विखेंना तोफांची सलामी देत जोरदार स्वागत करण्यात आले. एकंदरीतच सौ विखे आणि तनपुरे यांच्यात विकास कामावरून चांगलाच सामना रंगल्याचे दिसून आले. महायज्ञ पुजेसाठी सात सवाष्ण जोड्या बसवन्यात आल्या होत्या.प्रथम होम आणि यज्ञहवन सुरु झाल्या नंतर सदर कलशाची व मुर्तीची स्थापना करण्यापूर्वी कुरणवाडी गावातून दोन कि.मी.अंतरावर ढोल ताशाच्या गजरात मानाच्या काठ्या सह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री वाण,आणि धनगरी ओव्या झाल्या नंतर कोल्हापूर येथील हतकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिराचे मुख्य पुजारी आणि रिटायर्ड डि वाय एस् पी ह.भ.प. नारायण खाणू मोठे देसाई यांचे प्रवचन झाले. त्यांनी म्हाळोबा आणि बिरोबा हे कोण होते या विषयी गुरु शिष्यांची माहिती सांगितली.दुसऱ्या दिवशी सकाळी साकुरच्या व्रुंदावन आश्रमाचे मानकरी ह.भ.प. भागवताचार्य उगलमुगले महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. त्या नंतर देवाचे भगत – बाळासाहेब खिलारी, सिताराम खिलारी, राहुल खिलारी, महेश गवते,शंकर खिलारी, सत्यवान खिलारी, यांच्या हस्ते पंचारती ओवाळण्यात आली.बाबासाहेब ढाकणे, आणि अशोक आंधळे यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यासाठी घमाजी खिलारी,एकनाथ खिलारी, बापुसाहेब खिलारी,प्रगतशील शेतकरी रामनाथ गवते,व्हा.चेरमन पोपट खिलारी, पोलीस पाटील शिवाजी केदारी,उपसरपंच सुनिल खिलारी यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here