आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न झाली.

0

नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत 27 गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, या वेळी बिडीओ श्री गणेश चौधरी संबंधित अधिकारी, सर्व गावांचे ग्रामसेवक तसेच ठेकेदार उपस्थित होते. काम कुठपर्यंत आले, स्थानिक समस्या, इतर अडचणी व कामाचा वेग यावर चर्चा झाली.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, ग्रामीण भागातील जनतेस तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोणतीही काटकसर न करता काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. वसंतनगर, चंदनपुरी, कसाबखेडा, चींचविहिर, रोहिले बु, साकोरा, तळवाडे, न्यायडोंगरी, अनकवाडे रामनगर तांडा, रागुविर तांडा, कासारी इंदिरानगर, पानेवाडी, बेजगाव, वंजारवाडी, कुसुमतेल, माळेगाव कऱ्ह्यात, भार्डी, सावरगाव, कोंढार, नागापुर, जातेगाव, मोहेगाव, ढेकू, बोलठाण, मळगाव या गावात काम सुरू आहे. यामध्ये गावात विहिर, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, पंपगृह, पंपिंग मशिनरी, टाकी आदींचा समावेश असणार आहे.गुरुवार पासून या सर्व गावात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले या वेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here