Home Breaking News मणिपूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या : शिवसेना महिला आघाडी मनमाड

मणिपूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या : शिवसेना महिला आघाडी मनमाड

0

मनमाड : मणिपूरमधील कागपोकपी जिल्ह्यातील घटनेत दोन महिलांची नग्न दिंड काढली व त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केला. ही घटना दिनांक 4 मे रोजी घडली अशां नीच प्रवृत्तीचा शिवसेना महिला आघाडी जळजळीत निषेध करीत असून, मणिपूर येथील घटनेचे आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली, महिलांच्या बाबतीत शासनाने अतिशय कठोर कायदे करून त्यांना संरक्षण द्यावे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही.शिवसेना महिला आघाडी या निवेदनाद्वारे संबंधित गुन्हेगारस व आशा नराधमास त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसेल व बळी ठरलेल्या मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.शिवसेना मनमाड शहर महिला आघाडी तर्फे मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री थोरात साहेब यांना निवेदन देताना शिवसेना महिला शहर प्रमुख संगीता बागूल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, उपशहर प्रमुख सुरेखा ढाके,शहर संघटक नीता लोंढे, छाया कोकाटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here