नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र राज्य ,मुंबई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे,अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,नाशिक आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व अभियान निमित्ताने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अनुषंगाने श्रीमती गीतांजली बाविस्कर अप्पर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक, श्री. राकेश पाटील उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एन. डी. पॉलीटेकनिक कॉलेज, सभागृह,बाभुळगाव, येवला येथे जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा नोडल अधिकारी व विद्यार्थी यांच्याकरिता घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्राची वाजे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक उपस्थित होत्या. यावेळी मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मंचावर प्राचार्य यू. बी. जाधव सर, विभागप्रमुख पैठणकर सर, समतादूत चंद्रकांत इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी वाजे मॅडम यांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती चे कार्य, मोहिमेचा उद्देश, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बार्टीचे येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी नोडेल अधिकारी यांची भूमिका व जबाबदारी, याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य जाधव सर यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित देठे सर यांनी सूत्रसंचालन शीतल कुशारे तर आभार यू बी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एन. डी.टी. पॉलीटेकनिक कॉलेज बाभुळगाव, संतोष श्रमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य येवले सर यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेसाठी संतोष श्रमिक माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी व येवला व नांदगाव तालुक्यातील कॉलेजचे नोडेल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बार्टीच्या नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.









