अहमदनगर (सुनिल नजन/अहमदनगर) महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात नवीन नऊ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. नंतर काही आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे तर काही आमदार शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत आहेत ते पहा. ना.अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार पुढील प्रमाणे-१)ना. अजित पवार,२)ना.छगन भुजबळ,३)ना.दिलिप वळसे पाटील,४)ना. हसन मुश्रिफ,५)ना.धनंजय मुंडे,६)ना.आदिती तटकरे,७)ना.संजय बनसोडे,८)ना.अनिल पाटील,९)ना.धर्मरावबाबा आत्राम,१०)किरण लहामटे,११)निलेश लंके,१२) दौलत दरोडा,१३)मकरंद पाटील,१४)अतुल बेनके,१५)सुनिल टिंगरे,१६)इंद्रनील नाईक,१७)अशोक पवार,१८)अण्णा बनसोडे,१९)सरोज अहिरे,२०)बबनदादा शिंदे,२१)यशवंत माने,२२)नरहरी झिरवळ,२३)दत्ता भरणे,२४)शेखर निकम,२५)दिपक चव्हाण,२६)राजेंद्र कारेमोरे,२७)नितीन पवार,२८)मनोहर चंद्रिकापुरे,२९)संग्राम जगताप,३०)राजेश पाटील,३१)सुनिल शेळके,३२)दिलिप मोहीते,(विधान परिषदेतील आमदार)३३) रामराजे निंबाळकर,३४)अमोल मिटकरी,३५)शशिकांत शिंदे,३६)अनिकेत तटकरे,३७)विक्रम काळे,३८)सतिश चव्हाण, (खासदार)१)अमोल कोल्हे,२)प्रफुल्ल पटेल,३)सुनिल तटकरे, यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे नेतृत्व स्विकारलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सोबत असलेले आमदार पुढील प्रमाणे-१) प्रदेशाध्यक्ष- जयंत पाटील”२)पक्षप्रतोद जितेंद्र आव्हाड,३)रोहित पवार,४)राजेश टोपे,५)प्राजक्त तनपुरे,६)अनिल देशमुख,७)सुनिल भुसारा,८)सुमनताई पाटील,९)संदिप क्षिरसागर,१०)बाळासाहेब पाटील,११)चेतन तुपे,१२)मानसिंग नाईक,१३)अरुण अण्णा लाड(विधानपरिषद)१४)एकनाथ खडसे(वि.प.),१५)बाबाजानी दुर्गानी(वि.प.) (खासदार)१) सुप्रिया सुळे,२)श्रीनिवास पाटील,३)वंदना चव्हाण-(राज्य सभा),४)फौजिया खान-(राज्यसभा)यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर राहिलेल्या आमदारांनी तटस्थ राहण्याची भुमिका घेतली ते पुढील प्रमाणे१)नवाब मलिक,२)प्रकाश सोळंखे,३)बाळासाहेब आजबे,४)आशुतोष काळे,५)दिलिप बनकर,६)माणिकराव कोकाटे,७)चंद्रकांत नवघरे,८)राजेंद्र शिंगणे.यापैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शफथविधी झालेल्या नऊ जणांना अपात्र करण्यात यावे म्हणून विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे नोटीस पाठवली आहे. शरदचंद्रजी पवार यांनी आता खासदार सुप्रिया सुळे,आणि आमदार रोहित पवार हेच माझे खरे वारसदार राहतील असे प्रसार माध्यमांना सांगितले आहे. तर ना. अजित पवार यांच्या सोबत गेलेले अनेक आमदार पुन्हा धुमजाव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी सर्वत्र चर्चा फोनवर सुरू झाली आहे. ताजा कलम- कारवाईच्या भितीने आम्ही शरदचंद्रजी पवार यांना सोडू शकत नाहीत असा पवित्रा काही आमदारांनी घेतला आहे.तसे फोनवर ही सांगितले आहे. बातमी प्रसिद्ध होईपर्यंत अनेक घटना घडत आहेत.आमदारांच्या आकडेवारीत बदलही होउ शकतो प्रतिनिधी (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
Home Breaking News राष्ट्रवादीचे कोणते आमदार ना.अजित पवारकडे आणि कोणते आमदार शरद पवार यांच्या कडे...








