Home Breaking News ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राजर्षी शाहू महाराज...

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असोसिएशन च्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असोसिएशन च्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे सचिव प्रवीण अहिरे, अतिरिक्त सचिव सागर गरूड, कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ आदी उपस्थित होते,यावेळी असोसिएशन चे जेष्ठ कार्यकर्ते दिपक अस्वले व सुभाष जगताप यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदिप धिवर, यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिल सोनवणे यांनी केले.यावेळी सतिश भाऊ केदारे,सागर गरूड, दिपक अस्वले, किशोर खंडागळे आदी भाषणे ने केले.कार्यक्रमाचे आयोजन राहुल शिंदे, प्रेमदिप खडताळे, निखिल सोनवणे, धम्मदिप पखाले,संभुलाल मिना, सिद्धार्थ शिंदे,सचिन बेंद्रे, विनोद खरे, अर्जुन बागुल आदी ने केले.
कार्यक्रमाचे शेवटी असोसिएशन चे युवा कार्यकर्ते धम्मदिप पखाले यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here