Home Breaking News भारताच्या विकासात स्रीशक्तीचे मोठं योगदान:- डॉ.भारती पवार

भारताच्या विकासात स्रीशक्तीचे मोठं योगदान:- डॉ.भारती पवार

0

राज्य : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘मोदी@9’ महाजनसंपर्क या अभियानांतर्गत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते बोरगांव ता. सुरगाणा येथे करण्यात आले.
यावेळी डॉ. भारती पवार यांनी उपस्थित महिलांना केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून, मोदी सरकार मार्फत जनकल्याणकारी योजनाद्वारे करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखजोखा मांडला तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले.यावेळी राजू पाटिल, रमेश थोरात,कल्पना ताई भरसट,ज्योती पाटील, गणेश पाटील, गावित ताई ,अशोक गवळी, कल्पना भरसट, विठ्ठल गावित, वामन गवळी,रघुनाथ जाधव तसेच प्रांत विशाल नरवडे, बि.डि.ओ गायकवाड साहेब, तालुका कृषी अधिकारी राहणे साहेब, आरोग्य अधिकारी डॉक्टर रणवीर, पंचायत व ग्रामविकास उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्रावण देवरे, पाणीपुरवठा अधिकारी दळवी साहेब, कळवण प्रकल्प सहाय्यक तुषार पाटील,तुषार पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी झरेकर साहेब सहित महिला पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here