
मनमाड : महाराष्ट्र गुजरात आणि दादरा नगर हवेली राज्यातील पहिले आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वैचारिक एकता महासंम्मेलन नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आले होते आदिवासी संस्कृती चे संवर्धन करणे आदिवासी समाजाच्या विशेषतः युवकांच्या समस्यांवर विचारमंथन करणं हा या संमेलनाच्या उद्देश आहे,या महासंमेलना चा शुभारंभ पारंपरिक आदिवासी प्रथा, परंपरा प्रमाणे आदिवासी देवी देवता तसेच भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्यासह समाजातील आदर्श वीर पुरुष, स्वातंत्र्य सेनानी समाज सुधारकांच्या प्रतिमा पूजनाने झाला.या प्रसंगी डॉक्टर भारती पवार म्हणाल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारने आदिवासींच्या विकासासाठी बजेट देखील वाढवलेले आहे, विद्यार्थ्यांसाठी एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल उपलब्ध होत आहे अनेक योजना आदिवासींनी विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवत आहे परंतु जागृतेने त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.या वर्षीच्या केंद्रीय बजेटमध्ये आदिवासी भागात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती तसेच चाचणी करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, यावेळी कलाकारांनी पारंपारिक आदिवासी वेशात नृत्य सादर केले या कार्यक्रमात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
