अचानक पाथर्डी मार्केट कमेटीच्या निवडनुकीचा बिगुल वाजला आणि अनेक गावात मागील वर्षी सत्ता गमावलेल्यांनी गुढग्याला बाशिंग बांधले ?

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना जिल्हा बँकेच्या चेरमनपदी नियुक्त केल्यानंतर पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी आपला मोर्चा एकमेव विरोधकांच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी मार्केट कमीटीच्या निवडणूकीकडे वळविला आहे.मार्केट कमिटीची निवडणूक जाहीर झाली आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूकीकडे डोळे लाउन बसलेल्या भाजपच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची पळता भुई थोडी झाली. आमदार कार्यालयातून फोन येताच तालुक्यातील सर्वच चाटून पुसून कार्यकर्ते विठोबा राजे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निवडक कार्यकर्त्यांसह जातीने हजर झाले.२५६७ सभासदामधून एकूण १८ उमेदवार उभे करायचे आहेत. मलाच उमेदवारी मिळेल ही भाबडी अपेक्षा मनात ठेवून अनेक जण आलेले होते.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांची भाषणे ऐकून घेतल्यानंतर आमदार राजळे यांनी मागील वेळी अनेक गावात गाफील राहून सत्ता गमावलेल्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या देत खडेबोल सुनावले.मार्केट कमिटीच्या निवडनुकीचे सर्व नामनिर्देशन पत्र हे विड्रालसह आमदार कार्यालयातून भरले जातील.कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच हा चंग राजळे समर्थक यांनी बांधला आहे.कोणत्याही प्रकारची बंडखोरी सहन केली जाणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे.”आमदार ठरवतील ते धोरण आणि आमदार ज्याला गळ्यात उमेदवारी बांधतील तेच तोरण”असे ठरले. त्यामुळे निवडणूकी साठी गुढग्याला बाशिंग बांधून उमेदवारी मिळवण्या साठीच्या स्पर्धेत असलेल्या अनेकांच्या डोक्यात शिरलेली हवा निवडणूक सूरू होण्यापुर्वीच निघाली आहे. गेल्या पंचवार्षिक योजनेतील सत्ताधारी गटातील आमदार राजळेच्या नावाने शिमगा करणारे चार संचालक उमेदवार आमदार राजळे यांच्या गटात येउन मिळाल्याने आ. राजळे यांना ही निवडणूक सोपी वाटत आहे. जेष्ठ संचालक नारायण बापू धस यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षात मी सत्ताधारी गटातील संचालक होतो. पण मार्केट कमिटीत झालेली हाणामारी पाहून मी फक्त पाच मिटींगलाच हजर राहीलो पुन्हा तीकडे फिरकलो सुद्धा नाही ही या मार्केट कमीटीची अवस्था आहे हे आवर्जून सांगितले.त्यामुळे अनेक जणांनी मागिल संचालक मंडळाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या “संवाद यात्रा” आणि “संघर्ष यात्रा”यांच्या वरही जोरदार टीका करण्यात आली. ही निवडणूक २८ एप्रिल रोजी होत आहे. यावेळी गोकुळ दौंड, अभयकाका आव्हाड, अरुण मुंडे,म्रुत्यंजय गर्जे,माणिक खेडकर, अशोक चोरमले, संजय बडे,भिमराव फुंदे,रवी वायकर, उद्धवराव वाघ,सुभाष ताठे,बाबा आमटे, पुरुषोत्तम आठरे,काशिबाई गोल्हार,मंगल कोकाटे,यांच्या सह सहकारातील अनेक दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधारी मंडळाचे कार्यकर्ते ही सत्ताधारी गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली करत असल्याचे दिसून येत आहे. आमदार राजळे नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर करतात या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.कारण जिल्हा बँक ताब्यात घेणारे राजळे मार्केट कमिटीतही निश्चितच बाजी मारतील हे एक समिकरण कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाले आहे.घोडा मैदान जवळपास आले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here