
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ गड प्रसिद्ध आहे.दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची रीघ लागलेली असते. आमावस्या, पौर्णिमा, आणि यात्रा काळात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गडावर येत असतात. कानिफनाथ महाराजांना मलिदा आणि रेवडी हाच प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.नाथ भाविक भक्त पशुहत्या करून नैवेद्य घेऊन गडावर येत नाहीत.कारण नाथ सांप्रदायाला पशुहत्या मांन्य नाही म्हणून कानिफनाथ मंदिर परिसरात भाविकांनी पशुहत्या करु नये असे आवाहन कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष बबन ऊर्फ राधाकिसन मरकड यांनी केले आहे.फूलोरबाग यात्रा ही पाडव्याच्या अगोदर एक दिवस भरते आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी महापुजा केली जाते. तरी कानिफनाथ मंदिर परिसरात भाविकांनी पशुहत्या करू नये ही ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
