जळगाव पीपल्स को-ऑप बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 लाख 86 हजार रुपयांची मदत

0

जिल्ह्यात आजपर्यंत पीएम व सीएम निधीत 72 लाख 51 हजार 674 रुपये जमा
जळगाव, दि. 12 (जिमाका) – दि.जळगाव पीपल्स को-ऑप बँक लि. जळगाव यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 करीता 3 लाख 86 हजार 130 रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांचेमार्फत कोव्हीड-19 साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 69 लाख 86 हजार 674 रुपये तर पीएम केअर्समध्ये 2 लाख 65 हजार रुपयांचा निधी जमा केला आहे.
दि. जळगाव पीपल्स को-ऑप बँक लि., जळगावकडून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद व समाजाप्रती दाखविलेल्या दातृत्वाचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजाचे घटक म्हणून प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्समध्ये मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here