
मनमाड : मनमाड शहराच्या प्रत्येक घरा घरात येणाऱ्या 13 तारखेच्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण दिले जात आहे, आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेना मनमाड शहर, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, घरो घरी जाऊन हात जोडून नागरिकांना निमंत्रित करत आहेत, करंजवण योजनेची माहिती छापील बॅग, त्यात झालेली विकासाकर्याची माहिती पुस्तिका ( बदल घडतोय), आमंत्रण पत्रिका डिजाइन तसेच मिठाई चां बॉक्स असून मोठ्या संख्येने या सुवर्ण क्षणासाठी निमंत्रित केले जात आहे,मनमाड करांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि म्हणूनच मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार असून , मनमाड कर जनता या नियोजनाचे स्वागत करताना दिसून येत आहेत, अनेक स्थानिक महिलांनी या बद्दल आमदारांचे धन्यवाद मानत आहेत.
