अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे या मताशी मी सहमतः आमदार निलेश लंके

0

अहमदनगर : (सुनिल नजन /अहमदनगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे ही धनगर समाजाची मागणी रास्त असुन “अहिल्यानगर” या नामांतराच्या भुमिकेशी मी सहमत असल्याचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांनी सांगितले. ते पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायती मध्ये निवडून आलेल्या नवीन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करताना बोलत होते. खासदार सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या नामांतराला विरोध दर्शविल्यामुळे धनगर समाज आता विखे पिता पुत्रा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे.आता आमदार निलेशजी लंके यांनी या मागणीला पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्ह्यात नामांतरा वरून राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील शासकीय अधिकारी नेमकी काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तिसगाव ग्रामपंचायत मध्ये आमदार लंके यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला त्यावेळी सरपंच सौ.मुनिफा शेख,उपसरपंच सौ.संगिता गारुडकर, शिवसेनेचे माजी पाथर्डी तालुका प्रमुख रफिक शेख, अँड. सतिश पालवे, तिसगाव ग्रामपंचायतीचे शिल्पकार इलियास शेखसर,शेखबाबा पुढारी, शबानाभाभी शेख,लतिफ शेख सर,इल्फाम शेख,पंकज मगर,अमोल गारुडकर, जफर शेख,बिसमिल्ला पठाण, रजिया शेख,चांदभाई तांबोळी, रमेश नरवडे, जुबेर पठाण, कदिर पठाण,गणेश गारुडकर, अनिल रांधवणे,ईजाज शेख इत्यादी मांन्यवर उपस्थित होते .(प्रतिनिधी/सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here