
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोर्ट ब्लेअरमधील जीबी पंत रुग्णालयात मॉक ड्रिलचा आढावा घेऊन अत्यावश्यक परिस्थितीला तोंड देण्यासाठी टेली कन्सल्टेशन सेवासुविधा वापरासह कोविड चाचणी क्षमता, लॉजिस्टिक व PSA ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या बाबतीत प्रशासनाच्या तयारीची नोंद घेतली यावेळी अपघाती वार्ड पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मंडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मंत्रालय देशातील सर्व नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
