आमदार सुहास आण्णा कांदे कबड्डी चषक उद्घाटन संपन्न

0

मनमाड : शहरात आमदार सुहास अण्णा कांदे 70 वी कबड्डी चषक वरिष्ठ गट पुरुष व महिला नाशि जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मध्ये ७२ संघ सहभागी झाले असून  या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये हे संघ नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर रेल्वे क्रीडांगणावर आमदार सुहास अण्णा कांदे चषक नाशिक जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी  कबड्डी स्पर्धेला सुरवात झाली. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड, शिवसेना जिल्हाउप प्रमुख सुनीलभाऊ, हांडगे,तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे,शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे, शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, अपंग सेना शहराध्यक्ष विठ्ठल नलावडे, इरफान मोबीन, लाला नागरे, दिनेश घुगे, दिलीप सूर्यवंशी, अमोल काळे, रिपाइं नेते गंगादादा त्रिभुवन, रवींद्र घोडेस्वार आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धा तीन दिवस चालणार असून यासाठी चार क्रीडा मैदाने तयार करण्यात आले आहे.  सदर स्पर्धेला जिल्ह्यातील ४८ पुरुष संघ तर १४ महिला संघ सहभागी झाले आहे
६० पुरुष तर २० महिला सामने असे एकूण ८० सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना बघावयास मिळणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून एकूण २२ खेळाडूंची निवड होणार असून या २२ खेळाडूंमधून १२ खेळाडू सदर स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद चाचणी कबड्डी  स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे हा संघ नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य विलास मोरे, वाल्मीक बागुल, रेहमान शेख, शाकीर शेख, राजू डमरे, रमेश केदारे व नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व सदस्य, बाळासाहेबांचे शिवसेना मनमाड शहर व पंच मंडळ स्पर्धा यशस्वितेसाठी प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here