
मनमाड : मनमाड शहर शिवसेना तर्फे करण्यात आलेल्या आवाहन प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मनमाडकर नागरिक महिला व युवक युवतींनी एकत्र येऊन श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आरोपीचा जळजळीत निषेध नोंदवला.
मोठ्या संख्येने जमलेल्या मनमाडकर तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकां कडून मनमाड शहरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.
या याप्रसंगी तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, राजेंद्र भाबड, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, महीला आघाडी शहर प्रमुख संगीता बागुल, युवासेना उपजिल्हाधिकारी नितीन सानप, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये श्रद्धा वालकर या युवतीचा प्रियकर आफताब याने तिच्या लग्नाच्या मागणीनंतर तिचा खून केला व निर्घृणपणे तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते दिल्ली येथे वेगवेगळ्या भागात फेकून दिले या अतिशय हृदय द्रावक घटनेनंतर संपूर्ण देशभरात या घटनेच्या निषेध नोंदवले जात आहे. या आरोपीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हावी असे मनोगत उपस्थितांनी येथे व्यक्त केले. त्यानंतर श्रद्धा वालकर यांना सामुदायिक श्रद्धांजली देण्यात आली. आरोपीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे पत्र शिवसेना मनमाड शहर युवासेना तसेच महिला आघाडी तर्फे मनमाड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.
सदर कॅण्डल मार्च चे आयोजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर युवासेना शिवसेना महिला आघाडी तर्फे करण्यात आले होते.⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
