माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाडची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्री.रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पतपेढी कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली

0

मनमाड:पतपेढीचे आजपर्यंतचे कार्य पाहता आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा पतपेढीने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे.मनमाड शहरातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी पतपेढी एक विश्वासाचे व खात्रीचे कार्य करत आहे.चालू वर्षी पतपेढीला 7 लाख 14 हजार 44 इतका वार्षिक नफा झाला असून पतपेढीने 5 टक्के दराने लाभांश वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.पतपेढीच्या सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून या वर्षापासून पतपेढीने कर्ज मर्यादा रुपये 7 लाख इतकी केली आहे तसेच सभासदांच्या पहिल्या दोन मुलगा किंवा मुलीला त्यांच्या विवाहासाठी 11 हजार रुपये इतक्या रकमेची विवाह भेट योजना देखील सुरू केली आहे.पतपेढीची जबाबदारी सांभाळत पतपेढीने सर्व सभासदांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 10 लाख इतकी विम्याची रक्कम संरक्षित केली आहे.कोणी सभासदाने कर्ज घेतलेले नसेल आणि काही दुर्दैवी घटना घडली तर विम्याची पूर्ण रक्कम त्या सभासदाच्या कुटुंबास मिळणार आहे.अशावेळी त्या कुटुंबाला मोठ्या रकमेचा आर्थिक हातभार पतपेढीकडून मिळणार आहे.अशा विविध लाभदायी व कल्याणकारी योजना राबविण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.पतपेढीचे चेअरमन श्री.रमेश थोरात,व्हा.चेअरमन श्री.सुरेश सानप,सेक्रेटरी श्री.अविनाश पारखे तसेच संचालक श्री. द्वारकानाथ झांबरे,श्री.आरिफ शेख,श्री.चेतन सुतार,श्री. रामकृष्ण नागरे,श्री.प्रफुल्ल देशपांडे व संचालिका सौ.संगीता पोतदार यांच्या सहकार्याने पतपेढीचे कार्य उंच स्तरावर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here