मनपा शाळा क्र.७१ मध्ये पालक -शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

0

नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये पालक – शिक्षक मेळावा माजी नगरसेवक मा. सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी शालेय गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतपद्य गात मान्यवरांचे स्वागत केले. तद्नंतर मा. सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी करताना शाळेच्या यशाचा चढता आलेख पालकांसमोर मांडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक -शिक्षक परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविताताई साळुंके, उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सदस्य प्रणिता कोल्लूर, शिवाजी गाडेकर इ.उपस्थित होते.मेळाव्यात पालकांना पोषण आहार, दैनंदिन अभ्यास व गृहपाठ- प्रमिला देवरे मॅडम, शालेय शिस्त व आरोग्य- किसन काळे सर, विविध शिष्यवृत्त्या व संबंधित कागदपत्रे- विनोद मेणे सर, ५ वी,८ वी शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एम एस परीक्षा- रुपाली ठोक मॅडम, मतदार कार्ड – आधारकार्ड लिंक करणे, विद्यार्थी आधारकार्ड काढणे- मगर मॅडम, विद्यार्थी उपस्थिती गैरहजेरी प्रमाण, नीटनेटकेपणा- कविता वडघुले मॅडम, विविध स्पर्धा, उपक्रम व गुणवत्ता विकास- सुवर्णा थोरात मॅडम, स्वच्छता पंधरवडा व पालकांची जबाबदारी- शैलजा भागवत मॅडम या विविध विषयांवर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन चालू असतानाच शाळेतील तंत्रस्नेही शिक्षिका रुपाली ठोक मॅडम यांनी तयार केलेली शाळेच्या यशोगाथेची पीपीटी पालकांना प्रोजेक्टरवरुन दाखविण्यात आली.
यावेळी शाळापूर्व तयारी अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेला सहकार्य करणाऱ्या सवयंसेवकांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.शाळेतील शिक्षिका किर्तीमाला भोळे यांच्या प्रयत्नाने शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका अलका कुलकर्णी मॅडम यांच्या दातृत्वातून इ. पहिलीच्या ७३ विद्यार्थ्यांना पाट्या वाटप मा. सुधाकरभाऊ बडगुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षपदावरुन बोलताना मा.सुधाकरभाऊ बडगुजर यांनी शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यासाठी शिक्षकांनी गणित व इंग्रजी या विषयांकडे अधिक लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. तसेच शाळेच्या सर्व सेवासुविधांसाठी मी कटिबद्ध असल्याचे उपस्थित पालकांना सांगितले.पालक शिक्षक मेळाव्याचे सूत्रसंचलन प्रमिला देवरे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन शोभा मगर मॅडम यांनी केले. मेळाव्याचे नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे, किसन काळे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी केले.मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर असलेली पालकांची उपस्थिती हि लक्षवेधी असल्याने मेळावा यशस्वी झाल्याचे समाधान लाभल्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here