
नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार डॉ.भारतीताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह नाशिक येथे लपा योजना ओतूर व लपा योजना जामशेत या प्रलंबित प्रकल्पांबाबत आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी लपा योजना ओतुर प्रकल्पासाठीचा प्रस्तावाचे अंदाजपत्रक तयार करुन सुधारीत प्रशासकीय मान्यता साठी शासनास प्रस्ताव सादर करणे प्रलंबित असल्याची माहिती मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांनी दिली तसेच लपा योजना जामशेत प्रकल्पाचा देखील प्रस्ताव अद्यापपोवेतो शासनास सादर केलेल्या नसून तो महिनाभरात शासनास सादर करण्यात येईल असे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांनी बैठकीत सांगितले.
सदर दोन्ही प्रकल्पबांबत तात्काळ कार्यवाही करुन दोन्ही प्रकल्पांचे अंदाजपत्रकासह प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत मा. मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश दिलेत.
याप्रसंगी ओतूर व जामशेत परिसरातील धरण ग्रस्त शेतकरी ग्रामपंचायतीचे सदस्य , प्रतिष्ठीत नागरीक , भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी देखील सदरचे प्रकल्प पुर्ण करण्याची मागणी केली.यावेळी उपस्थिती सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
