लम्पी आजारा बाबत गैरसमज पसरविल्यास तसेच लसीकरणासाठी अवास्तव पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार – राज्यमंत्री डॉ .भारती पवार

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांनी लंपी संसर्गजन्य आजारामुळे शेतकऱ्यांची पशुधन संकटात असल्याने नाशिक जिल्ह्यातील पांगरी ता. सिन्नर येथील पशुपालकांना भेट देऊन लंपी जनावरांच्या रोगाची पाहणी, जनावरांची तपासणी, रोगाबदल माहिती, त्याचा रोगप्रसार, लक्षणे, बचावात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती घेऊन गावकऱ्यांशी या रोगासंदर्भात चर्चा केली . आजारा बाबत गैरसमज पसरविल्यास तसेच लसीकरणासाठी अवास्तव पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल . कोरोनाकाळात प्रतिबंधित क्षेत्रात ज्याप्रमाणे दक्षता घेण्यात आली , त्याच धर्तीवर लम्पी आजाराबाबतही काळजी घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार यांनी सांगितले . सिन्नर तालुक्यातील पांगरी बु ,येथे डॉ . पवार यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या . लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व राज्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्या अनुषंगाने बाधित असलेल्या जनावरांच्या साधारण ५ किलोमीटर भागातील लसीकरणावर भर देण्यात यावा . केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लम्पी आजाराबाबत सतर्कता बाळगण्यासाठी शेतकऱ्यांना डॉ . भारती पवार यांनी केली बाधित जनावरांची पाहणी आवाहन करण्यात आले असून , त्याबाबत आवश्यक ती सर्व मदतही उपलब्ध करून देण्यात येत आहे . जिल्हा परिषदेमार्फत लम्पी आजाराबाबत खबरदारी घेण्यात आली असून त्याअंतर्गत गोवंश जनावरांचे लसीकरणही करण्यात आले आहे . त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी प्रमाणात असून आतापर्यंत साधारण २४ गोवंश जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती . त्यातील १८ जनावरे बरी झाली आहेत , असे डॉ . पवार यांनी सांगितले . यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहायक आयुक्त डॉ . बाबूराव नरवाडे , जिल्हा परिषदचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . विष्णू गर्जे , सिन्नर प्रांताधिकारी डॉ . अर्चना पठारे , तहसीलदार प्रशांत पाटील , गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे , तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश दुबे , पशुसंवर्धन अधिकारी डॉ . अविनाश पवार , डॉ . विकास चकतर , डॉ . ऊर्मिला जगताप , डॉ . सचिन वर्ते , डॉ . निवृत्ती आहेर डॉ . अरविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते, होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here