कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार

0

मनमाड : बदलापूर दि. २४ ऑगस्ट.(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) कुळगांव बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर समाधानकारक कार्याच्या वर्षपूर्ती निमित्त बदलापूर शहरातील सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून श्री योगेश गोडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आज दुपारी 3 वाजता पालिका सभागृहात सर्व विभागांच्या विभागप्रमुख, कर्मचारी, पत्रकार आणि बदलापूरकर नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बदलापूर शहराचा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बदलापूर शहरातील नागरी सोयीसुविधा, प्रशासकीय कामे याबाबतच्या प्रश्नांना धडाडीने स्वीकारून योग्य वेळी समर्थपणे धाडसाने योग्य ती निर्णायक पावले उचलून काम करत आल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे अशी भावना श्री योगेश गोडसे यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासक पदभाराची जबाबदारी हातात असेपर्यंत जास्तीत जास्त चांगली कामं करत राहीन याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वाशीत केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना आणि सदिच्छा व्यक्त केल्या.शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि राजमाता जिजाऊंची प्रतिमा असे सत्काराचे स्वरूप होते.सिटीझन वेल्फेयर असोसिएशन चे जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर यांनी प्रशंसनीय शब्दात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सदस्या सौ सुवर्णा इसवलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंची प्रतिमा, नाना देशमुख यांच्या हस्ते शाल- श्रीफळ तर इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला. वेल्फेयरचे सदस्य डॉ. अमितकुमार गोईलकर यांच्या संकल्पनेतून असोसिएशनचे सचिव श्री राजेंद्र नरसाळे सल्लागार श्री दिलीप नारकर, श्री विलास हंकारे, अध्यक्ष श्री सुनील दळवी, खजिनदार मंगेश सावंत, सदस्या सौ सुवर्णा इसवलकर, श्री दिलीप शिरसाट या सर्वांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिव श्री राजेंद्र नरसाळे यांनी संयुक्तपणे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here