
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील एक हजार शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधी द्यावा या साठी आ.तनपुरे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना केल्या तसेच अतिशय मोठ्या व्यासाचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील एकहजार शाळा खोल्यांची दयनीय अवस्था झाली आहे.त्या शाळा खोल्यांच्या बांधकामा साठी शासनाने दिलेल्या तीस कोटी निधीपैकी दहाकोटी निधी शिल्लक आहे तो वापरण्यासाठी, शासनाने आदेश द्यावेत अशी लक्षवेधी सुचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी विधानसभा अधिवेशनात मांडली.(प्रतिनिधी सुनिल नजन /अहमदनगर)
