
वासोळ- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे दुष्परिणाम याविषयावर व्याख्यान पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मोरे ह्या होत्या तर आरोग्य सहाय्यक सुरेश सोनजे, आरोग्य सहाय्यीका सोनाली पाटील, आरोग्य सेवक शांताराम आहेर,भूषण जाधव पंडित पाठक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी हे होते.यावेळी मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आजच्या काळात मोबाईल ही एक मानवाची गरज बनली आहे परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर काय दुष्परिणाम होतात याविषयी जाणीव जागृती व्हावी व मोबाईलचा गरजे पुरताच वापर करावा याविषयी डॉ.स्वाती मोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य सहाय्यक सुरेश सोनजे यांनीही मार्गदर्शन केले.शेवटी मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल एखंडे केले( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ
मो- 9130040024)
