जवखेडे खालसा-कासारवाडी सोसायटीच्या चेरमन पदी चा.उ.वाघ तर व्हाइस चेरमनपदी रा.र. कासार यांची बिनविरोध निवड

0

अहमदनगर : ( सुनिल नजन/अहमदनगर )
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात गाजलेल्या आणि अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडनुकित शेतकरी मंडळाला (१३×०)घवघवीत यश मिळाल्यानंतर जवखेडे खालसा-कासारवाडी सेवा सोसायटीच्या चेरमनपदी चारुदत्त उद्धवराव वाघ यांची आणि व्हाइस चेरमनपदी रावसाहेब रखमाजी कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेरमन/व्हाइस चेरमन पदासाठी एक-एकच अर्ज आला. चेरमन पदासाठी चारुदत्त उद्धवराव वाघ यांच्या नावाची सुचना माजी चेरमन नजमोद्दीन शेख यांनी मांडली त्यास शिवाजी वाघमारे यांनी अनुमोदन दिले.तर व्हाईस चेरमन पदासाठी रावसाहेब रखमाजी कासार यांच्या नावाची सुचना बाबासाहेब सरगड यांनी मांडली त्यास बाबासाहेब मतकर यांनी अनुमोदन दिले. सोसायटीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी गौतम देवळालीकर यांनी उपस्थित नवनिर्वाचित संचालक संभाजी कासार, नामदेव वाघ, समसोद्दीन शेख,हरीभाऊ जाधव,सौ. द्वारका बाई श्रीहरी मतकर,सौ.नंदाबाई खंडू कासार यांना दाखल झालेले उमेदवारी अर्ज वाचून दाखवत या बिनविरोध निवडी जाहीर केल्या. तत्पूर्वी धुरंधर नेते उद्धवराव वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित नेते आणि नुतन संचालक मंडळाची मते अजमावून घेण्यात आली त्यावेळी सर्वांनी एकमूखाने उद्ववराव वाघ घेतील तो निर्णय आम्हाला मांन्य राहील अशी जाहीर कबुली दिली. आणि मग हा निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित चेरमन चारुदत्त वाघ यांनी सर्वांना विश्वासात घेऊन स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली.व विरोधकाकडून निवडणूकीत वाडा संस्कृती वर झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.प्रथम जवखेडे दुमाला सोसायटीच्या वतीने चेरमन कचरू पाटील नेहुल आणि व्हाइस चेरमन रमेश नरवडे, वसंतराव नेहुल यांनी जवखेडे खालसा-कासारवाडी सोसायटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. या वेळी जेष्ठ नेते पोपटराव आंधळे,नुरमहंमद शेख,दगडू आंधळे, अँडव्होकेट लतिफ शेख, राजेंद्र मतकर,मुस्ताकभाई शेख,राधाकिसन कासार, हरिश्चंद्र आव्हाड, शिवाजी मतकर, बाळासाहेब कासार, नामदेव सरगड,विठ्ठल मतकर, सिताराम मतकर, संजय मतकर, संजय वाघ,विशाल आंधळे,सचिव भाउराव कासार आणि शेतकरी ग्रामविकास मंडळाचे प्रवक्ते संभाजी राजे वाघ हे उपस्थित होते. शिवसेनेचे नेते सुरेश वाघ यांनी ही एकजूट भविष्यात ही कायम ठेवली जाईल असे सांगत सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here