जवखेडे दुमाला येथे भारतीय स्टेट बँकेच्या वतीने नवीन शेतकरी पीककर्ज आणि गोल्डलोन मेळावा संपन्न

0

(सुनिल नजन/अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव भारतीय स्टेट बँकेच्या वतीने जवखेडे दुमाला येथे नवीन शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शेतकरी मेळावा घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच शिवाजीराव नेहुल हे होते. या मेळाव्यात, नवीन पिककर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा दर,व्यवसायिक कर्जे, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करुन देताना येणाऱ्या विविध अडचणीवर कशी मात करावी या विषयावर सखोल मार्गदर्शन बँकेचेशाखा मँनेजर मारुती धेंडे यांनी केले. पिककर्ज फाईल कशी तयार करावी. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, घेतलेल्या कर्जाची बारा महिन्यात परतफेडीची अट मांन्य करून ते कर्ज जर अकराव्या महिन्यातच परतफेड केले तर मिळणाऱ्या सुविधा या विषयावर बँकेचे कँशिअर जावेदभाई शेख यांनी सविस्तर माहिती दिली. गोल्डलोण कोणत्या व्यवसायासाठी दिले जाते या विषयीही अचूक माहिती देउन उपस्थित शेतकऱ्यांना कर्जाच्या फाइल्स तयार करण्याच्या योग्य सुचना दिल्या.प्रारंभी अँड. वैभव आंधळे यांनी बँकेच्या कार्य क्षेत्रातील एकुण आठ गावातील शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची काय पात्रता असावी लागते या विषयावर अगदी ग्रामीण भाषेत माहिती दिली. या मेळाव्यास अनिल नेहुल, लक्ष्मण नेहुल, पंडित वाघ, हरिभाऊ नेहुल, संदिप नेहुल,संतोष सरगड,चंद्रभान नेहुल, सुभाष नेहुल,भाउसाहेब कसोटे,सुभाष कराळे,गंगाराम नेहुल, गोरे साहेब,सोपान नेहुल, बाळासाहेब नेहुल,बाजीराव नेहुल, भरत सरगड,सुदाम भोसले,कारभारी नेहुल, मेजर अरुण वांढेकर,संदिप वाळके, जवखेडे खालसा येथील स्टेट बँक युनिट व्यवस्थापक अजित नेहुल यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here