स्थानिक जनतेला टोलमधुन सवलत लागु करा : ना.डॅा.भारती पवार

0

नाशिक: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॅा.भारती पवार यांनी भा.रा.रा.प्रा.च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत राष्ट्रीय महामार्ग ८४८ नाशिक पेठ या ५३ कि. मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर चाचडगांव येथे सुरु होणाऱ्या टोल नाकाच्या २० किलोमीटरच्या परिघातील ग्रामस्थांनी त्यांना टोल शुल्कात सवलत मिळविण्यासाठी वाहनांची नाक्यावर नोंदणी करून घेण्याबाबत तसेच स्थानिकांना प्राधान्याने टोल मध्ये सवलत देण्याबाबत कार्यवाही करण्याचा सुचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. या रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे काम २६.०४.२०२२ ला पुर्ण झाले असून राष्ट्रीय महामार्गाच्या सदरील खंडाकरीता चाचडगाव, ता.दिंडोरी, जि.नाशिक (कि. मी. ३२) येथे टोल प्लाझा स्थापित करण्यात आलेला आहे. याबाबत ना.डॅा.भारती पवार यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरणच्या चाचडगाव येथील टोल प्लाझा पासून २० किलोमीटरच्या परिघात राहणारे नोकरदार, अव्यवासायिक, स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी २०२२-२३ या वर्षासाठी मासिक पास उपलब्ध करुन देण्यास यावा असे या वेळी ही सांगितले.टोल शुल्काकरीता भारत सरकारने राजपत्र क.का.आ. १९२७ (अ), दि. २५.०४.२०२२ जारी केले आहे. महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार चाचडगाव टोल प्लाझावर टोल शुल्क भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. टोल शुल्क आकारण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्यक्षात टोल नाका दि. २२.०६.२०२२ सकाळी पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी भा.रा.रा.प्रा.चे प्रकल्प संचालक श्री.भाऊसाहेब साळुंके यांनी दिली.नाशिक-पेठ हा यापूर्वी अत्यंत खराब होता. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेत ते पूर्णत्वास नेले आहे. यामुळे नाशिक पासून पेठ पर्यंत जाण्यासाठी नागरिकांची वाट आता सुखकर होणार आहे. गुजरातकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. महामार्गावर कोटंबी सारखा अवघड श्रेणीतील घाट देखील आहे. कोटंबी घाटामध्ये सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत व अपघात नियंत्रण करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली व ती सोडविण्याकरीता त्वरीत उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री पवार यांनी दिले,या बैठकीत अधिकाऱ्यांकडून राजपत्राच्या तरतूदींनुसार स्थानिकांना लागू असलेल्या सवलतीं बाबत अवगत केले . तसेच आपात्कालीन सेवे अंतर्गत रूट पॅट्रोल वाहन, क्रेन व रूग्णवाहिका सेवा महामार्गावर २४ तास उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सदरचा मार्ग हा आदिवासी बहुल भागातील असुन पेठ तालुक्यांतील आदिवासीं नागरीकांना काही विशेष सवलत देतां येईल का? याबाबच देखील उपाययोजना करण्याबाबत व चाचडगाव टोलवर स्थानिकांना लागू असलेल्या सवलतींबाबत जनजागृती करण्याची सुचना देखील ना.डॅा.भारती पवार यांना भा.रा.रा.प्रा.ला दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here