तिसगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडनुकित जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या आदर्श पँनलला ५ जागा तर सत्ताधारी बाळासाहेब लवांडे यांच्या जनसेवा पँनलला ८ जागा!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाथर्डी तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तिसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकित सत्ताधारी जनसेवा पँनलला ८ जागा मिळाल्या असुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक काशिनाथ पाटील लवांडे यांच्या आदर्श पँनलला ५ जागा मिळाल्या आहेत.ही सोसायटी भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे समर्थक बाळासाहेब लवांडे यांच्या ताब्यात होती. आता हीत्यांनी निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी यश मिळवले आहे सत्ताधारी जनसेवा पँनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्व साधारण कर्जदार गटातून बाळासाहेब नरहरी लवांडे(३५७ मते), इंगळे बाबासाहेब म्हातारदेव(३४६मते),गारुडकर मोहन कारभारी(३२५मते),रायकर अरुण गोविंद(३२०मते), शेख अस्लम मकसुल(३२०मते),तांबोळी आरिफभाई ईसाक(३१८मते), महिला राखीव गटातून सौ.नरवडे निर्मला बाबासाहेब (३४९मते),इतर मागासवर्गीय गटातून गारुडकर भरत अर्जुन हे सर्वाधिक(३६७)मते मिळवून विजयी झाले आहेत. विरोधी आदर्श ग्रामविकास पँनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-सर्व साधारण कर्जदार गटातून तिसगावचे मा. सरपंच काशिनाथ राधाकिसन लवांडे(३४७मते), नशिर गंजू शेख(३१८मते), महिला राखीव गटातून सौ.शोभा विक्रम ससाणे(३५०मते), अनुसूचित जाती गटातून शरद भानुदास खंडागळे(३३७मते), भटक्या विमुक्त जमाती मधून मंन्सुर सजन फकिर(३३७मते) मिळवून विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.आर.सराफ यांनी काम पाहिले. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडनुकित सत्ताधारी मंडळाने ही सोसायटी ताब्यात घेउन पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. मतदारांनी जो आमच्या वर विश्वास दाखवला त्यास तडा जाउ देणार नाही असे माजी चेरमन बाळासाहेब लवांडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here