स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0

मनमाड : ( प्रतिनिधी -निलेश व्यवहारे)आज दिनांक 28 मे 2022 ,चिंतामणी मंगल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन मनमाड येथे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड व समस्त सावरकरप्रेमी यांच्या तर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून तसेच सामूहिक जयस्तुते गायन करून साजरी करण्यात आली यावेळी कुमारी श्रावणी पुरंदरे हिने दिपप्रज्वलन तसेच उपस्थित बाळगोपाळांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले ,ची पार्थ गंगेले याने स्वातंत्रवीर यांच्यावर हिंदीतून कविता सादर केली ची वेदांत जोशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तृत्व सादर केले तसेच यावेळी दैनिक तरुण भारतचा कालजीय सावरकर या विशेषांकाचे प्रकाशन सौ वैष्णवी पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच त्याविषयी श्री रमाकांत मंत्री यांनी अंकाविषयी सर्वांना माहिती दिली यावेळी श्री विजय पुरंदरे, श्री प्रकाश गाडगीळ सर, श्री युवराज बळेल व वेदिका ब्राह्मण महिला मंडळ तसेच समस्त सावरकर प्रेमी उपस्थित होते जयस्तुते या स्वतंत्रतेच्या स्तोत्राच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here