गांधी, विखे, राजळे,कर्डीले,दौंड यांच्या योगदानातुन करंजी गणात साडेतीन कोटींची कामे ः एकनाथ आटकर

0

(अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी-करंजी गणात माजी खासदार स्व.दिलिप गांधी, अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुवेंद्र गांधी,अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे,शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनिता दौंड यांचे पती गोकुळभाउ दौंड यांच्या योगदानातून मीरी-करंजी गणात साडेतीन कोटींची कामे झाली असून अजूनही अडीच कोटींची कामे प्रस्तावित आहेत अशी माहिती मीरी-तिसगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष एकनाथजी आटकर यांनी दिली. ते चिचोंडी ता.पाथर्डी येथे आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांच्या समवेत संदिप दाणवे,आबा गरूड, मच्छिंद्र भिंगारदिवे,विजय ईपरकर,गणेश जर्हाड,अनिल आव्हाड, राहुल आटकर,योगेश आटकर, पांडू फुलमाळी,हे उपस्थित होते. एकनाथ आटकर पुढे म्हणाले की मी८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण करतो अशी आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे तीचे आम्ही काटेकोर पणे पालन करतो.मीरी-तिसगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत एकूण ४५ गावे माझ्या जन संंपर्कातील आहेत. करंजी गणातील लोकांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे.माझ्या कामाची उजळणी झाली पाहिजे अशी अपेक्षा आटकर यांनी व्यक्त केली.या पत्रकार परिषदेसाठी ह.भ.प.गणेश महाराज कुदळे,बबनराव गायकवाड, विठ्ठल गायकवाड, भाउसाहेब पोटे,रामनाथ शिरसाठ,महादेव गीते,बबूभाई शेख,नवनाथ पालवे यांनी विषेश परिश्रम घेतले.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here