
(अहमदनगर प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या नवीन जलजिवन मिशन योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी मतदार संघातील मिरी-तिसगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी जमिनीच्या वरुन नवीन डायरेक्ट पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उर्जा, अदिवासी, उच्च शिक्षण मंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिली ते तिसगाव येथील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या नवीन वालकंपाउडच्या बांधकाम शुभारंभा प्रसंगी तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.अध्यक्ष स्थानी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे हे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,सिताराम बोरुडे, बंडूपाटील बोरुडे, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, यांच्या सह अनेक नेते उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी कामत शिंगवे येथे नविन जनित्राचा लोकार्पण सोहळा, आडगाव येथे रस्ता खडीकरण ई.विकास कामाचा शुभारंभ पार पडला.याप्रसंगी परिसरातील अनेक गावातील नेते हजर होते. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)
