मुक्या प्राण्यांची सेवा केल्याने आपल्या जीवनात भरभराट होते बापू खरे

0

नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – आपल्या मानवाच्या जीवनात कितीतरी चांगले-वाईट प्रसंग येत असतात त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यांच्या जीवनात देखील
तसेच प्रसंग येत असतात. परंतु मुक्या प्राण्याची सेवा केल्याने आपल्या जीवनात नक्कीच भरभराटी होते. असे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीचे उप-सरपंच बापू राज खरे यांनी मृत प्राण्यांची अंत्यसंस्कार करताना व्यक्त केली.
आठ डिसेंबर 2021 रोजी बुधवारी रात्री ब्राह्मणगाव ते सटाणा रोडवरील अंजनाई मंदिराजवळ एका घोड्याला अज्ञात वाहनाने टक्कर मारल्याने ते घोडे जागीच ठार झाले होते. बुधवारी सकाळी ग्राम विकास अधिकारी विजय पवार यांनी सदर घटना ब्राम्हण गावचे उपसरपंच बापूराज खरे यांना माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच बापूराव खरे यांनी तात्काळ घटनास्थळी आपल्या मित्रासह धाव घेतली. त्यावेळी त्या भूत पडलेल्या मुक्या घोड्या जवळ त्याचे एक लहान पिल्लू रात्रभर अश्रू ढाळताना त्या मृत घोडा जवळ त्यांना दिसले. बापूराज खरे यांना पण अश्रू अनावर झाली. व त्यांनी तात्काळ ब्राह्मणगाव ग्रामपंचाय-तिचे माजी सरपंच सुभाष दादा अहिरे. यांना जेसीबी साठी फोन केला. व सुभाष आहिरे देखील सामाजिक भावनेतून घटनेच्या जागेवर जेसीबी पाठवून रस्त्याच्या कडेला खोल खड्डा करून त्या मृत घोड्याला (प्राण्याला) उपस्थित सर्वांनी संस्कार दिले ( केले ) हे करीत असताना त्या घोड्याचे छोटे पिल्लू मात्र गहिवरल्या डोळ्यांनी नुसते पाहत होते.
या मुक्या प्राण्यांच्या सेवा केल्याने आपल्या जीवनात नक्कीच भरभराट होते हे नक्की असे ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापूराव खरे यांनी बोलताना सांगितले.या मुक्या प्राण्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ब्राम्हण गावचे उपसरपंच रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बापू राज खरे त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री हेमंत अहिरे, श्रावण देवरे,कैलास उर्फ गणू बापू अहिरे दर्शन अहिरे, विनायक खरे, पंडित अहिरे, अशोक बच्छाव, सचिन व्यापार, सुरेश अहिरे विशेष मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here