अहिल्या नगर ( अहिल्यानगर जिल्हा)
परमार्थात देवाला तीळा एवढा अभिमान सहन होत नाही. गोकुळातील गौळणीला,तो कृष्ण परमात्मा दिसायचा.एक वेळेस त्या परमात्म्याचा आवाज गौळणीला येत होता,परंतु तो परमात्मा त्यांना दिसत नव्हता.त्या वेळेस गौळणींची अवस्था अशी झाली होती की त्या गौळणी म्हणतात हे कन्हैया तु मला का भेटत नाहीस.तु मला फक्त एक वेळ भेट दे अशी त्या गौळणी आळवणी करताना म्हणतात.असे प्रतिपादन शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथे सालाबाद प्रमाणे २५ वर्षा पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तना प्रसंगी येळीच्या येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज येळीकर यांनी केले.या प्रसंगी त्यांनी सेवेसाठी “कन्हैया रे जगजेठी,देई भेटी एकवेळा,काय मोकलिले वणी सावजाने वेधियेले” ही संत तुकाराम महाराज यांची गौळण सेवे साठी घेतली होती.महाराज पुढे सांगतात ती गौळण म्हणते अरे कन्हैया तु मला या संसार रूपी अरंण्यात का सोडलेस.कन्हैया आता पर्यंत तु मला दिसत होतास,परंतु आता तु मला का दिसत नाही.हे कन्हैया माझ्या कडून काही चुकले म्हणून मी संसाराकडे मागे पाहिले.संसारात पुढे पहावयाचे असते.परमार्थात मागे पहावयाचे असते.जन्माला आल्यावर भगवंत आठ वर्षाचे होते.देवकीची तपश्चर्या महान असल्यामुळे भगवंत लहान झाले.पुतना मावशी ही भगवंताचा वध करण्यासाठी आली होती पण भगवंताने तीला मोक्ष दिला.हा अखंड हरिनाम सप्ताह महंत रामगिरी महाराज येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या अखंड हरिनाम सप्ताहात सर्व ह.भ.प.अंकुश महाराज कोठुळे खडकी, मच्छिंद्र महाराज अमृते, श्रीराम महाराज मचे, प्रविण महाराज कोरडगावकर, भागवत महाराज मरकड,महेश महाराज नरवडे, तेजस्वीनी ताई नवले, ह.भ.प. रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास मृदुंगाचार्य पांडुरंग महाराज धस, विठ्ठल महाराज डोईफोडे, गायनाचार्य सचिन महाराज काळे,भागवत महाराज मरकड, राजुमामा फलके, राजेंद्र मरकड, ज्ञानेश्वर सोनवणे, निवृत्ती महाराज फलके,किशोर फलके,अभिमंन्यु मरकड समस्त महिला भजनी मंडळ फलकेवाडी, चोपदार सुरेश वाणी, हे उपस्थित होते. महाप्रसादाची पंगत राजेंद्र आबासाहेब फलके यांच्या तर्फे देण्यात आली.सप्ताह कमेटीचे उत्तमराव लंगोटे,लक्ष्मण मरकड,अशोक फलके,रामदास फलके,दिपक काळे,राजेंद्र भगवान फलके, किशोर सदाशिव फलके, ॲडव्होकेट रामचंद्र मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी २०२६ या सालातील आदर्श वारकरी पुरस्कार निवृत्ती महाराज फलके व शाहु महाराज येवले यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Breaking News सुलतानपूर खुर्द(फलकेवाडी) येथे महंत रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम...







