सिद्धार्थनगर मध्ये दहा दिवसाचे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न..

0

प्रतिनिधी ( महेश्वर भिकाजी तेटांबे) सिध्दार्थनगर ता. कोरेगाव, जि.सातारा मध्ये २९ जानेवारी पासुन भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने १० दिवसाचे महीला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. त्याचा सांगता कार्यक्रम रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात माता रमाई आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त प्रथम अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एन. एम. आगाने , जिल्हाध्यक्ष. व्ही.आर.थोरवडे ,तालुका अध्यक्ष. अनिल कांबळे, केंद्रीय शिक्षिका शोभा कांबळे, डॉ. इंजे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात खंडाईत,भीमनगर चे सरपंच सुरेश कांबळे, दरे गावचे सरपंच अनिल कदम, सामजिककार्यकर्ते चंद्रकांत कांबळे ,सागर बगाडे ,विशाल गायकवाड , किशोर जाधव, नागेश मोरे उपस्थित होते. सिद्धार्थनगर गावचे सरपंच,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व ग्रामस्थांचे भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गायकवाड साहेब यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सिद्धार्थनगर बौध्द विकास मंडळाचे सचिव सुशील प्रकाश मोरे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद कदम, माजी सरपंच नंदाताई शेलार, माजी उपसरपंच शकुंतला कांबळे, शर्मिला अनिल कदम , सोनाली सुशिल मोरे, जानव्ही मोरे, सिद्धांत विठ्ठल मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महासभेने घेतलेल्या कार्यक्रमाचे अभिनंदन केले आणि अश्याच प्रकारे कार्यक्रम वेळोवेळी सिध्दार्थनगर मध्ये घेण्यात यावे असे आव्हान केले. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल सिद्धार्थनगर बौध्द विकास मंडळाचे अध्यक्ष. देवेंद्र मोरे उपाध्यक्ष. प्रविण सपकाळ माजी. अध्यक्ष. अशोक कांबळे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक मंडळीने अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच. गोविंद कदम, उपसरपंच शेवंता पवार, माजी उपसरपंच आनंदा कांबळे, माजी सरपंच तुकाराम कांबळे, माजी उपसरपंच विजय मोरे, . ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोरे, नामदेव जगताप, अनिल मोरे ,सन्नी कांबळे,मनोज कदम, तेजस कांबळे,अनिकेत मोरे तसेच सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः महिला आणि तरुण वर्गाने प्रयत्न केले.धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here