मनमाड – मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी काळात साजरे होणारे श्री गणेश उत्सव व मोहरम सणाचे अनुषंगाने आज दिनांक 17-08-2020 रोजी रोजी सायंकाळी 17 30 ते 19-15 पावेतो मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे मनमाड शहरातील शांतता समिती सदस्य शासकीय कार्यालयाचे अधिकारी पत्रकार, गणेश मंडळ पदाधीकारी, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठीत नागरिक, पोलीस पाटील, वाद्य चालक मालक, यांची शांतता समिती बैठक घेण्यात आली बैठकीस 100 ते 120 लोक हजर होते. सर्वांना गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून कुठल्याही प्रकारे मिरवणूक काढली जाणार नाही तसेच सोशल डिस्टंसिंग चे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे बाबत सूचना दिल्या. सर्वांनी उत्सव शांततेत व साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन







