सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील आमठाणा केंद्रातील सर्व शाळा मध्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन अश्या पध्दतीने विद्यार्थी शिक्षण चालू असून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी.टी. सिरसाट आणि आमठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.व्ही.जी.कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील शाळामध्ये विद्यार्थी चे शिक्षण थांबु नये यासाठी उपक्रम घेण्यात येत असून केळगाव परिसरातील सर्व शाळा यात सहभागी असून आज मुर्डेश्वरवस्ती शाळेतील मुख्याध्यापक श्री.पी.ए.गाढवे यांनी विद्यार्थ्यांना कृतीपुस्तिका विद्यार्थ्यांच्या घरी ,शेतात जाऊन विद्यार्थ्यांना त्या वाटप केल्या. कोविड 19 च्या नियमानुसार सोशल डिस्टनसिंग च्या नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांना कृतीपुस्तिका वाटप केल्या. प्रत्येक विद्यार्थीनी सोडवल्या कृतीपुस्तिका जमा करून दर आठवड्याला कृती पुस्तिका देण्यात येतील. कृतीपुस्तिका वाटप केल्याने विद्यार्थी आणि पालक यांनी समाधान व्यक्त केले . *आमठाणा केंद्रात ऑनलाईन ऑफलाईन अश्या पध्दतीने शिक्षण चालू असून या कामी सर्व गावकरी तसेच पालक यांचे सहकार्य लाभत आहे ,प्रत्येक गावातील सुशिक्षित तरुण हे प्रेरक म्हणून नेमलेले असून ते विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असून समाधान वाटत आहे ,ह्या संकटात शिक्षण थांबू नये अशी प्रतिक्रिया श्री.व्ही.जी.कुंभारे यांनी दिली. कोरोना काळात शाळा बंद आहेत परंतु विद्यार्थी शिक्षण थांबु नये म्हणून दर आठवड्याला कृतीपुस्तिका देऊन अभ्यास कसा चालू राहील यासाठी प्रयत्न चालू आहेत,सर्व विद्यार्थ्यांचे पालक नियमित अभ्यास घेऊन सहकार्य करतात म्हणून त्यांच्या पर्यंत नियमीत कृतीपुस्तिका पोहचल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करतो अशी माहिती श्री.पी.ए.गाढवे यांनी सांगितले,