येवला : धुळगाव सरपंच पदी दत्तात्रय गायकवाड यांची वर्णी
येवला तालुक्यातील धुळगाव येथील शिवसेना (उबाठा ) गटाचे व येवला तालुक्याचे युवा नेते संभाजी राजे पवार यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय एकनाथ गायकवाड यांची धुळगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी एकमताने निवड. ग्रामपंचायतच्या महिला सरपंच रुक्मिणी जनार्दन सोनवणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दत्तात्रय एकनाथ गायकवाड यांनी दावा करत नामांकन दाखल करून दत्तात्रय गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत धुळगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी दत्तात्रय गायकवाड यांची वर्णी
लागली यावेळी लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया पार पडत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नारायण गायके तर तलाठी कदम व ग्रामविकास अधिकारी गोरख निकम यांच्या देखरेखी खाली सरपंच मतदान निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडताच दत्तात्रय गायकवाड यांची. धुळगांव चे नवनिर्वाचित सरपंच म्हणून जाहीर घोषणा करण्यात आली यावेळी सहकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत फटाक्यांची अतिश बाजी व गुलालाची उधळण करत छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने गावातील परिसर दणाणून सोडला होता तसेच एकमेकांना पेढ्यांची भरवण करत जल्लोष साजरा करण्यात आला
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह, छत्रपती मित्र मंडळाचे तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते








