Home Breaking News श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या” एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये “डायरेक्ट...

श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या” एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये “डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्ससाठी इंडक्शन प्रोग्राम उत्साहात सुरू

0

नाशिक : श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या” एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये “डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्ससाठी इंडक्शन प्रोग्राम उत्साहात सुरू
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या “एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,” नाशिक येथे नवीन डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्ससाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची सुरुवात १५ सप्टेंबर २०२५ रोजी प्राचार्य डॉ. विशाल गुलेंचा यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत संस्थेच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या दिवशी विद्यार्थ्यांना संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची सविस्तर माहिती देण्यात आली – लायब्ररी, प्रात्याक्षिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम्स आणि क्रीडा सुविधांची ओळख करून देण्यात आली. तसेच, महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, “एस.एन.पी.टी. टॉक, वादविवाद स्पर्धा, व इतर सह-पाठयक्रम उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शैक्षणिक अभ्यासक्रम, वर्गांच्या वेळापत्रका, तसेच परिक्षा पद्धती (Internal + External Exams, Assignments, Practical Exams इ.) याविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच १६ सप्टेंबर २०२५ या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय उपेन्द्रभाई दिनानी सर उपस्थित होते. त्यांनी “स्वप्ने पाहा, उद्दिष्टे ठरवा आणि भविष्य घडवा” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी ध्येय निर्धारण, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. “Good Option, Bad Option & No Option” या संकल्पनांची सखोल माहिती. त्यांनी सांगितले की Good Option म्हणजे आपल्या क्षमतेनुसार योग्य निवड, Bad Option म्हणजे चुकीची निवड जी भविष्यात अडचणी निर्माण करू शकते. No Option ही स्थिती टाळण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यांनी Career Knowledge आणि Technology Opportunities वर प्रकाश टाकत सांगितले की विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत चाललेल्या तंत्रज्ञानातील बदलांशी अपडेट राहणे आवश्यक आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा रोडमॅप तयार करण्याचे आणि दिशादर्शक ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवृत्त करणारे ठरले. १७ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. मोहिनी गुरव मॅडम यांनी “फार्मसीमध्ये सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व” या विषयावर सत्र होणार आहे. १८ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. शुभांगी पवार मॅडम यांनी “फार्मसीमधील करिअर संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.१९ सप्टेंबर २०२५ रोजी इंडक्शन प्रोग्रामचा समारोप प्रतीमा करकाळे मॅडम यांच्या “वैकक्तिक विकास (Personality Development)” या विषयावरील प्रेरणादायी सत्राने होणार आहे. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी व इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here