Home Breaking News अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त राहुरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा...

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त राहुरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त राहुरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत अर्जुन महाराज तनपुरे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सत्यजीत तांबे, आणि माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे हे होते. या सोहळ्यात चौदा जणांना आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रिकेट संघ यांना हे पुरस्कार राहुरी येथील स्नेहपुज लाॅन्स मंगल कार्यालयात प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट महीला प्रशासक म्हणून राहुरीच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.उषाताई तनपुरे, दिव्यांगा साठी विशेष योगदाना बद्दल सौ सविता काळे,उत्कृष्ट महीला उद्योजक म्हणून सौ संध्यारजनी काकडे, शाहीरीतून अध्यात्माकडे या बद्दल शिवशाहीर कल्याण काळे, वैद्यकीय सेवा सुविधा या बद्दल डॉ तन्वीर देशमुख, शेतकऱ्याचा आवाज म्हणून रवीभाउ मोरे, उत्कृष्ट पत्रकारिता गोरक्षनाथ शेजुळ, शैक्षणिकक्षेत्र दत्तात्रय वाणी, सामाजिक क्षेत्र गणेश हारदे, समालोचक अप्पासाहेब ढोकणे, आदर्श शिक्षक गणेश घुगे सर,कराटे प्रशिक्षक नारायण माळी,अहिल्यादेवी स्मारक योगदान सिताराम विटनोर, धनगर समाज वधु वर सचिन कोळपे, उत्कृष्ट क्रीडा संघ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रिकेट संघ तमनर आखाडा, आणि अहमदनगर जिल्ह्याला “अहिल्यानगर” हे नाव देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर जी रथयात्रा काढली होती त्या बद्दल यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर इत्यादी मान्यवरांना वरील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हे जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी सोमनाथ बाचकर यांना ही सन्मानित करण्यात आले.माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले.नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉ उषाताई तनपुरे यांच्या कार्याबद्दल बोलताना म्हणाले की नगराध्यक्ष पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. गल्ली बोळात आणि संपूर्ण वार्डातील तक्रारी समजून घेण्यासाठी किती कसरत करावी लागते या बद्दल माहिती सांगितली कारण त्यांच्या मातोश्री सौ दुर्गाताई तांबे याही संगमनेर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा होत्या या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या हातातील काम टाकून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो आणि तत्पर रहावे लागते हे अनुभवाचे बोल सांगितले. तसेच तनपुरे परीवाराने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असल्याचेही आवर्जून सांगितले.यावेळी वैद्यकीय,विधिज्ञ, प्रशासकीय सेवा, सरपंच,संत सेवा, पत्रकारीता,राजकीय, सामाजिक,उद्योजक इत्यादी क्षेत्रांतील, व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या सह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here