Home Breaking News केव्हिन नाईक फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गेट 2025 परीक्षेत उज्वल कामगिरी

केव्हिन नाईक फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गेट 2025 परीक्षेत उज्वल कामगिरी

0

नाशिक : केव्हिन नाईक फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गेट 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून, राहुल दराडे याने अखिल भारतीय स्तरावर (AIR) 338 वा क्रमांक मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याचबरोबर धीरज घोटेकर (AIR 1354), सचिन खैरे (AIR 1881) आणि सुमित सांगळे (AIR 5821) यांनी देखील यश संपादन करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.ही परीक्षा आयआयटी रुरकी या राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेतर्फे घेतली जाते. गेट परीक्षेतील या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष श्री. उदय घुगे, सरचिटणीस श्री. हेमंत धात्रक आणि सहचिटणीस श्री. दिगंबर गीते तसेच सर्व विश्वस्त आणि संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या घवघवीत यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक दर्जाची पातळी उंचावली असून, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट ठरणार आहे. गेट परीक्षेत मिळवलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध होतील असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश दरेकर यांनी सांगितले. तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here