Home Breaking News आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोला प्रत्येक...

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोला प्रत्येक दहा नवीन बस

0

नांदगाव : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोला प्रत्येक दहा नवीन बस मिळाल्या. पहिल्या टप्प्यात 5/5 बस आल्या.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते नवीन बसचे उद्घाटन.काही दिवसांपूर्वी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस डेपोतील जुन्या झालेल्या बसची परिस्थिती सांगत नवीन बसेसची मागणी केली होती.
या मुळे आता प्रवाश्यांना नवीन बसमध्ये आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे.यानंतर नांदगाव व मनमाड बस डेपो करिता पहिल्या टप्प्यात 5/5 नवीन बस उपलब्ध झाल्या असून आज या बसचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते नारळ फोडत उपस्थित फित कापत उद्घाटन करण्यात आले.मतदार संघातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नांदगाव व मनमाड आगार येथिल बस अत्यंत जुन्या झालेल्या असुन या बस वारंवार नादु रुस्त होत असतात. सदर बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडत असुन अपघात देखिल होत आहे. त्यामुळे प्रवाशी खाजगी वाहतुकीकडे वळत असुन खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेत असल्यामुळे खाजगी वाहनांचे अपघात होवून जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या बसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना समोरे लावे लागत आहे. त्याकरिता नांदगाव मनमाड आगार येथे नविन बस उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली होती.
या प्रसंगी राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुनील जाधव, प्रकाश शिंदे, ईश्वर सानप कार्यशाळा अधीक्षक, मयूर सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक, विनोद अप्पर, विलास गीते, सुनील कासार, डीपी जगधने, किरण शिनगारे, अभिजित शेरेकर, अण्णा अप्पर, अरुण सांगळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here