Home Breaking News कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांनी निवडणूकीत विरोधकांचे पाणीपत करीत हॅट्ट्रिक साधुन ऐतिहासिक...

कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांनी निवडणूकीत विरोधकांचे पाणीपत करीत हॅट्ट्रिक साधुन ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून कासार पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने पेढे तुला सोहळा संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अ.नगर जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधकांचे पाणीपत करीत हॅट्ट्रिक साधून ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून आमदार राजळे यांचा कासार पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार आणि पेढे तुला सोहळा संपन्न झाला.तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने गावाच्या वतीने भव्य दिव्य असा सन्मान सोहळा आणि पेढे तुला कार्यक्रम संपन्न झाला.आमदार राजळे यांचे कासार पिंपळगावात आगमन होताच तोफांच्या सलामीत व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात व जेसीबीच्या सहाय्याने फुलांच्या वर्षावात मिरवणूक काढूण जोरदार स्वागत करण्यात आले. मतदारसंघातील कोणत्याही गावात झाला नाही अशा भव्य दिव्य सोहळ्यासाठी मतदार संघातील अनेक गावांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. दिनांक 4 ते11 फेब्रुवारी या कालावधीत सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांनी 34 वर्षांपुर्वी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील अनेक नामवंत किर्तनकारांची किर्तने झाली.आणि शेवटी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि आमदार मोनिका ताई राजळे यांच्या सत्कार व पेढे तुला समारंभाने या अखंड हरिनाम सप्ताहातील सोहळ्याची सांगता झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचा सत्कार करून पुढील सन 2029 सालात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चौकार मारण्यासाठी सुबेच्छा दिल्या. ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांचाही ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.पाथर्डी शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावात झाला नाही असा व आठवणीत राहणारा भव्य दिव्य अशा स्वरूपात हा समारंभ सोहळा संपन्न झाला.सत्काराला उत्तर देताना आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की या ऐतिहासिक विजयात लाडक्या बहिणी आणि राजिव राजळे मित्र मंडळ आणि ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांचा सींहाचा वाटा आहे.एक महिनाभर प्रचार केला आणि विजय मिळवून दिला म्हणून सर्व माता भगिनींचे आमदार राजळे यांनी आभार मानले.या समारंभासाठी सरपंच मोनालीताई राजळे,शिवाजीराव भगत, सोपानराव तुपे, संभाजी राजळे, नानासाहेब देशमुख, रामदास म्हस्के सर, विनायक म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,राधाकिसन राजळे, देविदास राजळे, दिपक देशमुख, देविदास केळकर, जेष्ठ नेते उद्धवराव वाघ, पोपटराव कराळे,वैभवराव आंधळे, बाबासाहेब बर्डे,कुशिनाथ बर्डे, बापुसाहेब भोसले, रामकिसन काकडे, ज्ञानदेव जगताप, अशोक ढगे, रविंद्र आरोळे, महादेव आव्हाड महाराज, केशव महाराज गुजर आव्हाणेकर, बबनराव भिसे, दत्तात्रय महाराज राजळे, शामराव म्हस्के, दादा कंठाळी, सुनिल परदेशी, अनिल राजळे,बाबा राजगुरू, सुनिल पुंड,आबा काळे, सुखदेव म्हस्के, सुभाष माने, सुभाषराव ताठे, शेषराव कचरे, बाबाजी बनसोडे महाराज, सरपंच बाबासाहेब पठाडे,अशोक गर्जे, भाऊपाटील राजळे,म्हातारदेव शेळके यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.तुषार तुपे यांनी सुत्रसंचालन केले.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here