Home Breaking News पाथर्डी पोलिस स्टेशनसह विविध ठिकाणी पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

पाथर्डी पोलिस स्टेशनसह विविध ठिकाणी पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

0

अहमदनगर (सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) प्रारंभी व्रुत्तपत्र क्षेत्रातील पहिलं दर्पण हे व्रुत्तपत्र सुरू करणारे आणि पत्रकार श्रुष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.पाथर्डी पोलिस स्टेशनसह शहरातील विविध ठिकाणी पत्रकार सन्मान सोहळा मोठ्याउत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम अभयकाका आव्हाड यांच्या वतीने बाबुजी आव्हाड महाविद्यालयात, नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात गाडे सर यांच्या वतीने, नंतर रेणुका माता पतसंस्था कार्यालयात, नंतर पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये, वसंतदादा पाटील विद्यालयात अनिल शिरसाठ यांच्या वतीने, नंतर आमदार मोनिकाताई राजळे यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे भाजपा सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत “युवा संवाद “या कार्यक्रमा साठी मतदार संघातील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता पाथर्डी नगरपालिकेच्या कार्यालयात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत सर्व पत्रकार बांधवाना सन्मानित करण्यात आले.या सन्मान सोहळ्यात आमदार राजळे यांच्या हस्ते एका कॅलेंडरचे प्रकाशन करून सर्व पत्रकारांना बुके देउन सन्मानीत केले आणि सुबेच्छा दिल्या.एकंदरीत पाथर्डी शहरात अनेक ठिकाणी पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपले विचार व्यक्त केले. मुटकुळे साहेब म्हणाले की पत्रकारांनी पोलिसांच्या चुकांवर पांघरूण घालून नये.तुम्ही चुकीचा आरसा दाखवला तर आम्हाला तेथे दुरुस्ती करता येते.पत्रकारांनी पोलिसांशी प्रेमाचे संबंध ठेवावेत.जेथे चुका आहेत तेथे कान पकडणे हे तुमचे कामच आहे.डॉक्टर,पोलिस आणि पत्रकार यांना वेळ काळ याचं काहीच बंधनं नसते. जेथे घटना घडली तेथे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे लागते. सर्वच पत्रकारांशी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांचे सलोख्याचे संबंध आहेत.प्रिती भोजनाची व्यवस्था करुन सर्व पत्रकारांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. आपल्या कार्यालयात थोडाफार वेळ देउन पत्रकार सन्मान सोहळा साजरा केल्या बद्दल सर्व पत्रकारांनी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचें आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here