श्रीक्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ म‌ंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ म‌ंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. गुरुवर्य पोपट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दत्त मंदिरातील होमकुंडात वेगवेगळ्या मंत्रोच्चारात महायज्ञ चेतावण्यात आला होता. दत्त जन्मोत्सवा निमित्त पाळण्यात दत्त प्रतिमा ठेवण्यात आली होती. दत्त पादुकांचा गंगाजलाने महाभिषेक करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या महाराजांच्या भाविक भक्तांनी या दत्त जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांच्या मंदिरातील दरबारातील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक माता भगिनींना नवसाचे नारळ वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे ही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हरी जागर सुरू होता. या एकमुखी दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवाजी महाराज जाधव, डॉ. जगन्नाथ मरकड, महेश शिरसाठ, गणेश गडगे, शैलेश गायकवाड,अभिराज शिंदे, नागेश पांचाळ,ॲडव्होकेट टाकळीकर,अजय चितळकर, बाळासाहेब जाधव, पप्पू शिरसाठ, दिपक कांबळे, सुजित वदक, योगेश तिवारी, दिपक थोरात, सचिन जाधव, संदिप कर्डीले, संदिप पवार, शिवाजी शिंदे, संतोषशेठ छाजेड यांनी विशेष परिश्रम घेतले. कासार पिंपळगावातही भजन, किर्तन,हरीपाठ, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.म्हस्के परीवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.तसेच तिसगाव, वाघोली,पाडळी, जवखेडे दुमाला,केशव शिंगवे,मोहोज येथील दत्त मंदिरातही दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जवखेडे खालसा -कोपरे शिवारातील पैलवान बजरंग आंधळे पाटील यांच्या वस्तीवरही दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.एकंदरीत पंचक्रोशीतील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here