Home Breaking News खासदार सुजय विखे यांच्या हस्ते कोपरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि...

खासदार सुजय विखे यांच्या हस्ते कोपरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि साखर वाटप कार्यक्रम संपन्न

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे येऊन विविध विकास कामांचा शुभारंभ करत दाळ साखर वाटपाचाही कार्यक्रम केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.यावेळी जवखेडे खालसा गावचे सरपंच चारुदत्त वाघ, वैभवराव आंधळे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे,प्रतिक खेडकर हे आवर्जून उपस्थित होते.शाळा खोल्यांचेही उद्घाटन हनुमान टाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उघडे पाटील यांच्या हस्ते झाले.जलजिवन मिशन योजनेचे ठेकेदार ऋषिकेश ढाकणे, विशाल आव्हाड, यांनी लवकरच या योजनेचे पूर्ण केले जाईल अशी ग्वाही दिली.जलजिवन पाणी पुरवठा योजना (१कोटी१४लाख रुपये),डी.पी.टी.सी. अंतर्गत शाळा खोल्या बांधकाम ( १२लाख रुपये),२५१५ अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण,(१०लाख रुपये), धनगर तांडा सुधार योजने अंतर्गत पोव्हींग ब्लॉक बसवणे(१०लाख), हनुमान मंदिर सभामंडप दुरुस्ती सुशोभीकरण (१०लाखरुपये), बोरुडे वस्ती ते खाडे वस्ती दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते दुरुस्ती (१०लाखरुपये), इत्यादी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरे गावच्या सरपंच सौ.छायाताई भाऊसाहेब उघडे यांच्या हस्ते आमदार मोनिकाताई राजळे यांना सन्मानित करण्यात आले.सोबत ग्रामपंचायत सदस्य शंकर उघडे, सुभाष आव्हाड,मंगल वाघमोडे,सुमन धनवटे,सुमन आव्हाड,अजय रक्ताटे,नाथा खरात, तुकाराम ढाकणे,बाळू ससाणे,पोपट वाघमोडे, अशोक आव्हाड, म्हातारदेव उघडे, ज्ञानेश्वर आंधळे, आदिनाथ उघडे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर सोहळ्यासाठी उपस्थित न राहनाऱ्यांनी बावीस तारखेला गावातील हनुमान मंदीरात प्रत्येक घरातून दोन दोन लाडू आणून मारुतीस महानैवेद्य अर्पण करावा.व नंतर सर्वांना प्रसाद म्हणून लाडवाचे वाटप करण्यात आले पाहिजे असे आवाहन खासदार सुजयदादा विखे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here