अहमदनगर (सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरूवर्य मुनीमजी पोपट महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या भक्तांना या निमित्ताने आमंत्रित केले होते.दत्त जन्मोत्सवा निमित्त मढी तील तिसगाव रस्त्यावरील मंदिरात महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पाळणा, होम हवन पंचारती, भक्तीगीते, अन्नदान इत्यादी कारणांमुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महानुभाव पंथाचे अनेक अनुयायी यावेळी उपस्थित होते.गुरुवर्य मुनीमजी पोपट महाराज हे दर गुरुवारी, शनिवारी, अमावस्या या दिवशी भक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरवतात.अनेकांच्या समस्या सुटल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी महाराजांचे शिष्यगण निर्माण झाले आहेत. दिवसेनदिवस महाराजांच्या दरबारात अनेक भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.या दत्त जन्मोत्सव आणि महायज्ञ सोहळ्यासाठी डॉ जगन्नाथ मरकड , शिवाजी जाधव, गणेश गडगे, नागेश पांचाळ, अभिजित शिंदे, बाळासाहेब जाधव, संतोष गवांदे, संदिप पवार, विकास शिरसाठ, संदिप कर्डिले, शैलेश गायकवाड, कैलास सांडभोर, अशोक राक्षे, गजानन पांचाळ, आदिनाथ चितळकर,भगिरथ कटके, सुरेश जाधव, माउली देवकर, आनंद वीरकर, श्रीकांत टाकळकर यांच्या सह अनेक मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिराच्या परीसरात भाविकांनी वाहनासह मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.रस्त्याच्या कडेने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोपट महाराज यांचे एकमुखी दत्त मंदिर महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश होणे गरजेचे आहे.
Home Breaking News श्रीक्षेत्र मढी येथे एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सवा निमित्त महायज्ञ सोहळा संपन्न








