0

नाशिक : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये रविवारी वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाल्याने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा, फळबागा तसेच टमाटे, कांदा रोपे, गहू, हरबरा, ऊस, भातपिक, भाजीपाला इत्यादी पिके अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या आसमानी संकटात धीर धरावा व घाबरून जाऊ नये नुकसान ग्रस्तांना शासन स्तरावरून या नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तसेच नुकसानग्रस्त विमाधारक शेतक-यांना विमा कंपन्यांकडुन तात्काळ पिकविमा मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित दादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे.डॅा. भारती प्रविण पवार दिंडोरी लोकसभा खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांनी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here