कोल्हापूर : (प्रतिनिधी) : महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा फुले यांचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित सत्यशोधक महात्मा या लघुचित्रपटाचा प्रीमिअर शो मंगळवार दि. 28 नोव्हेंबर, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती निर्मात्या डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, बालकलाकार आदित्य म्हमाने यांनी दिली.क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ प्रस्तुत सत्यशोधक महात्मा या मराठी लघुचित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन मंदार रेळेकर, संगीत राजवीर जाधव, छायाचित्रण अमर पारखे यांनी केले आहे. व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे यांनी काम पाहिले आहे.कथा, पटकथा, संवाद अनिल म्हमाने यांचे असून आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, स्वरा सामंत, पृथ्वीराज वायदंडे, पल्लव गायकवाड, आतिफ काझी, पृथ्वीराज बाबर या बालकलाकारासह डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी, महेश्वर तेटांबे, डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, छाया पाटील, किशोर खोबरे, डॉ. निकिता चांडक, दत्तात्रय गायकवाड, निती उराडे, वर्षा सामंत, प्रिती गायकवाड, सनी गोंधळी, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर यांनी या लघुचित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, डॉ. निकिता चांडक, निती उराडे, नामदेव मोरे, नितेश उराडे, अरहंत मिणचेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.