Home Breaking News वडुले खुर्द येथे विरभद्र यात्रा महोत्सव संपन्न

वडुले खुर्द येथे विरभद्र यात्रा महोत्सव संपन्न

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) शेवगाव तालुक्यातील वडूलेखुर्द येथील ढोरजळगाव रोडवरील तुतारे वस्तीजवळील विरभद्र मंदिरात होईकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावात देवाच्या काठीची छबिना मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, गंगेच्या पाण्याने देवाला जलाभिषेक,वाण, वह्या,फडाच्या तालावर धनगरी न्रुत्य, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.डिग्रस येथील बिरोबा भक्त एकनाथ खाटेकर यांनी आगामी वर्षाचे होईक सांगितले ते पुढीलप्रमाणे गहु हरभरे ज्यांच्या कडे पाणी असेल त्यांच्याकडे च पिकतील.कपाशी, आणि कांद्याचा भाव उच्चांक गाठेल.दिवाळीला काही ठिकाणी पाउस पडेल तर काही ठिकाणी अजिबात पडणार नाही.चंपाषष्ठीला काही ठराविक ठिकाणीच पाउस पडेल काही ठिकाणी पडणार नाही.थंडीची लाट येईल, उन्हाळा चांगलाच भयंकर जाणवेल. सरकार कडून महाराष्ट्रातील काही जिल्हे दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर होतील.गहू तेजीत राहतील, आंतरजातीय विवाह होतील.दिवसा दरोडे पडतील.मायेच लेकरू पारख होईल म्हणजे आई मुलांची ताटातूट होईल.वाईट दिवस येतील. भविष्यात कोणत्याच पक्षाचे सरकार चालणार नाही.तर सरकार मध्ये ही चिवडा होईल.देवाच्या सहवासातील लोक सुखी राहतील.रोगराई थांबेल.पाण्याचा दूष्काळ पडेल.पुढील वर्षी जठूड साधेल म्हणजे म्रुग नक्षत्रात पेरणी होईल आणि चांगले पिक येईल. देवाच्या होईकात अशी भविष्यवाणी एकनाथ खाटेकर यांनी सांगितली.या वेळी मिरी येथील विरभद्र देवस्थानचे मुख्य भक्त सिताराम बाळाजी भगत,आबू वीर, मिरी सोसायटीचे नवनिर्वाचीत विद्यमान चेरमन आसाराम भगत.महादेव तुतारे,बापू तुतारे,, निवृत्ती पाटील दातीर, शेषराव आव्हाड सर, भाऊसाहेब आव्हाड,दिलिप आव्हाड,रमेश दातीर, पांडुरंग दातीर, राजेंद्र आघाव, बापुसाहेब पाटेकर,पराजी बुटे, देविदास पाटेकर,शहादेव खोसे,गोरक्ष जमधडे, डॉ.दौंड, नारायण दातीर,गावडे भगत, मारुती तूतारे, खोसे पहिलवान,तात्यासाहेब तुतारे ,दिलिप तुतारे,यांच्या सह तुतारे परीवार आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.या प्रसंगी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here