Home Breaking News हनुमान टाकळी येथील मंदिरावरील दोन कळस चोरीला,भाविकात प्रचंड खळबळ ,पोलिसांना सतर्क राहण्याचे...

हनुमान टाकळी येथील मंदिरावरील दोन कळस चोरीला,भाविकात प्रचंड खळबळ ,पोलिसांना सतर्क राहण्याचे वरिष्ठांचे आदेश

0

अहमदनगर : (सुनिल नजन/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित हनुमान मंदिरावरील पाच कळसापैकी दोन कळस अज्ञात चोरट्यांनी रात्री डल्ला मारून चोरून नेले आहेत.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महिला वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण हनुमान टाकळी गावातील सासरी नांदत असलेल्या सुवासिनी महिलांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी देऊन पाच कलश हनुमान मंदिरावर २१ मे २०२३रोजी मोठा सोहळा साजरा करत बसविले होते. शनिवारी दि.७ आँक्टोबर २०२३ रोजी पहाटे अज्ञात चोरांनी मंदिरावर चढून पाच पैकी दोन कलशाची चोरी केली आहे. सकाळी शनिवारच्या बाजारात असलेल्या ग्रामस्थांनी दूरवरून मंदिरावर कलश नसल्याचे समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश अप्पा महाराज यांच्या निदर्शनास आणून दिले असता ही चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. चोरीची माहिती कळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,हवालदार दराडे, पोलीस नाईक अनिल बडे, लबडे,पोलीस काँन्स्टेबल इश्वर बेरड,पो.काँ.राजू बर्डे, एकनाथ बुधवंत, पो.हे.काँ.राजेंद्र सुद्रिक,किशोर पालवे, निलेश म्हस्के हे सर्व फौज फाट्यासह घटनास्थळी हजर होउन चोरीतील सर्व बारकाईने तपासणी केली. अहमदनगर येथून ठसेतज्ञासह श्वान पथकालाही पाचारण केले होते.परंतु सदर कुत्री जागेवरच घुटमळत राहीली. शेवगाव विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील यांनी ही घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेऊन सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी चोरीची माहिती कळताच मंदिरास भेट देऊन पोलिसांना कसुन तपास करण्याच्या सुचना दिल्या आहेत.अनेक महिला भगिनींना सासरी नांदत असताना या कलश चोरीची माहिती समजताच आश्चर्याचा धक्काच बसलाआहे. चाळीत वर्षापुर्वी याच मुर्तीचे एका चोरांने चांदीचे डोळे काढून चोरी केली होती तेव्हा तो चोर आंधळा होउन आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मंच्छिद्रनाथ गडाच्या पायथ्याशी लोळत पडला होता तेव्हा लोकांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले होते असे गावातील जुने व्रुद्ध झालेले अजोबा सांगतात. ज्या चोराने कलशाची चोरी केली आहे त्यालाही हनुमानजी काही तरी चमत्कार दाखवून नक्कीच शिक्षा देतीलच अशी आजही भाविकांची श्रद्धा आहे. अमरापूर येथील देवीचा मुकुट चोरणारे चोर जसे पोलिसांनी कसुन तपास करून गजाआड केले तसे हनुमान टाकळी येथील ही चोराचा त्वरित छडा लाउन गुन्हेगाराला गजाआड करावे अशी पंचक्रोशीतील महिला भाविकांची मागणी आहे. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोराच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून साडेतीन लाख रुपये किमतीच्या कलशाची चोरी झाल्याचे समर्थ हनुमान देवस्थानचे ट्रस्टी अण्णासाहेब दगडखैर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.यावेळी अनेक सेवेकरी सर्व ग्रामस्थासह देवस्थानचे सचिव सुभाष बर्डे हजर होते.कोणत्याही परिस्थितीत चोरीचा छडा लावलाच जाईल असे पाथर्डी स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here