Home Breaking News खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव लौकीक करावे :-डॉ. भारती पवार

खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव लौकीक करावे :-डॉ. भारती पवार

0

राज्य : रोप स्किपिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने २४ व्या राष्ट्रीय रोप स्कीपिंग च्या स्पर्धा हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम वर उत्साहात संपन्न झाल्या . भाजपाच्या क्रीडा विंग च्या माध्यमातून ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातील खेळाडूंनी ह्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. ह्या प्रसंगी डॉ भारती पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या विजेत्या खेळाडूंना ताईंच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. . खेळाडूंनी जास्तीत जास्त मेहनत करून राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर जागतिक स्पर्धेत आपले व देशाचे नाव उज्वल करावे. असे आव्हान डॉ. भारती ताई यांनी केले.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, निर्देश शर्मा, शैलेश शुक्ल, सुनंदा पाटील, सुनिल केदार,संजय पाटील,मच्छिंद्र सानप यांच्यासह पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here